‘टोल’विरुध्द खळ्ळ फट्याक सुरुच

June 14, 2012 4:41 PM0 commentsViews: 5

14 जून

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्याविरुध्द आंदोलनाच्या घोषणेनंतर राज्यभरात टोल नाक्याची तोडफोड सुरुचं आहे. आज तिसर्‍या दिवशी ठाणे, अमरावती, जालना आणि वर्धा इथल्या टोल नाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत टोलवसुली बंद पाडली. काही नाक्यांची कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली. ठाण्यात आनंदनगर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. तर वर्ध्यात देवळी टोल नाक्यावर तोडफोड करणार्‍या 17 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपापूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईत वसुलीची रक्कम जमा होऊन सुध्दा टोल नाके सुरु असतील त्यांच्याविरोधात आंदोलन करणार असं जाहीर केलं होतं. राज यांचा आदेश मानून कार्यकर्त्यांनी मुंबईसह राज्यभरातील टोल नाक्यावर हल्लाबोल केला आहे.

close