मुस्लिम कोट्यावरून सुप्रीम कोर्टाचा केंद्राला पुन्हा दणका

June 13, 2012 10:10 AM0 commentsViews: 2

13 जून

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला आणखी एक धक्का दिला आहे. इतर मागासवर्गीय (ओबीसी)मध्ये 4.5 टक्के अल्पसंख्यांकासाठी उपकोटा देण्यावर सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा आंध्र प्रदेश हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे. या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी अशी याचिका केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केली होती. पण मुस्लिमांना कुठल्या आधारावर आरक्षण देण्यात आलं, असा सवाला सुप्रीम कोर्टाने केद्राला केला होता. पण केंद्र सरकार यांचं समाधानकारक उत्तर देऊ शकलं नाही.त्यामुळं सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश हाय कोर्टाचा निर्णय कायम ठेवला.

close