भूखंड लाटणार्‍या अधिकार्‍यांना राज्यमंत्र्यांनी घातलं पाठिशी

June 14, 2012 11:02 AM0 commentsViews: 2

14 जून

सिडको ही माझ्या अंडर आहे. कोणत्याही परिस्थितीत ही जमीन सोसायटीला मी मिळवून देईन. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दम आहे. जे बोलतो ते करुन दाखवतो फक्त मी सांगितल्या प्रमाणे पेपर तयार करा. मुख्यमंत्री देखील आपल्यालाला अडवणार नाही असं आश्वासन नाही तर गॅरेंन्टीच राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका प्रकारे राज्यमंत्र्यांनीच माझगावच्या डॉकच्या अधिरार्‍यांना पाठिशी घातलं. बहुचर्चित आदर्श घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा संरक्षण दलाची म्हणजेच नेव्हीची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणार्‍या माझगाव डॉकने केल्याचं उघड झालंय.या प्रकरणाबद्दल डॉकचे अधिकारी आणि सिडकोच्या अधिकार्‍याची बैठक नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मंत्रालयात बोलावली होती. या बैठकीत बेकायदेशीररित्या तयार करण्यात आलेल्या 15 सोसायट्यांचे चीफ प्रमोटर पैकी काही जण या बैठकीला उपस्थित होते.

संबंधित बातम्या

नवी मुंबईत 'आदर्श'घोटाळा ?

close