डॉ.सुदाम मुंडेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

June 15, 2012 2:13 PM0 commentsViews: 54

15 जून

डॉ. सुदाम मुंडे यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन फेटाळला आहे. सुदाम मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये होणार्‍या स्री भ्रूण हत्या उघड करणारं, स्टिंग ऑपरेशन 2010 मध्ये करण्यात आलं होतं. असा प्रकार परत घडणार नाही या अटीवर, त्यावेळी डॉक्टर सुदाम मुंडेला अंबेजोगाई कोर्टाने जामीन मंजूर केला होता. पण अलीकडे मुंडेंच्या हॉस्पिटलमध्ये घडणार्‍या स्त्रीभ्रूण हत्येची प्रकरण उजेडात आल्यानंतर, सुदाम मुंडेचा हा जामीन फेटाळण्यात आलाय.

close