‘आमिर खानचे वार्षिक उत्पन्न 36 हजार रुपये !!’

June 14, 2012 4:40 PM0 commentsViews: 127

14 जून

विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सामान्यांना सरकारी कार्यालयांमध्ये कितीवेळा चकरा माराव्या लागतात ते सर्वश्रूत आहे. पण नागपूरच्या तहसील कार्यालयात असाच भोंगळ कारभार उघड झाला आहे. इथं चक्क अभिनेता आमीर खानच्या नावानंच उत्पन्नाचा दाखला देण्यात आल्याचा प्रकार उघडतीस आला आहे. या प्रमाणापत्रासाठी आमीरचं वार्षिक उत्पन्न दाखवण्यात आलंय फक्त 36 हजार रुपये.. विशेष म्हणजे या प्रमाणपत्रावर आमीर खानचा फोटो सुध्दा आहे.

तरी सुध्दा तहसील कार्यालयातून हे प्रमाणपत्र कसे काय देण्यात आलं हाच मोठा प्रश्न इथं उपस्थित झाला आहे. सध्या 10 वी ,12 वीचा निकाल जाहीर असून ऍडमिशनसाठी विद्यार्थ्यांची एकच लगबग सुरु झाली आहे. ऍडमिशनसाठी लागणारी प्रमाणपत्रं झटपट देण्यासाठी दलालांचा सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी 300 ते 400 रुपये घेऊन 'सेटिंग' करुन ताबडतोब प्रमाणपत्र दिली जातं असल्याचं उघडं झालंय. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची शक्यता आहे. या अगोदरही ठाण्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावानेच रेशन कार्ड काढण्याचा प्रकार घडला होता.

close