वांद्र्यात स्थानिकांना 144 कलमांतर्गंत नोटीस

November 25, 2008 3:19 PM0 commentsViews: 1

25 नोव्हेंबर, मुंबईगोविंद तुपेवांद्रे -वरळी सी लिंक प्रोजेक्टला होणारा विरोध लक्षात घेऊन इथल्या स्थानिकांना 144 कलमांतर्गत नोटीस बजावण्यात आलीय. या नोटीसीअंतर्गंत पाचपेक्षा अधिक लोकांना मोर्चे आणि आंदोलन करण्यास बंदी घातली आहे. प्रकल्पाला कोळी बांधवांकडून होणारा प्रस्तावित विरोध लक्षात घेऊन ही नोटीस बजावण्यात आली आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीनं मच्छिमारांना 75 फूटांचा गाळा बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते पूर्ण नं केल्यामुळे कोळी बांधव आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं समजतं.

close