…तर युपीएतून बाहेर पडण्यास तयार – ममता

June 14, 2012 12:55 PM0 commentsViews: 5

14 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. सोनिया गांधींनी प्रणवदांच्या नावावर ठाम असल्याचं सांगितल्यानंतर संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी युपीएतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. प्रणवदांच्या नावाला आपला विरोध कायम आहे कोणत्याही परिस्थिती त्यांना पाठिंबा देणार नाही भलेही मला युपीए सोडावी लागली असा इशारा ममतादीदींनी काँग्रेसला दिला आहे.

आज काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करत प्रणव मुखर्जी आणि हमीद अन्सारी यांच्या नावावर आम्ही ठाम आहोत असं स्पष्ट केलं. तसेच ममतादीदींनी सोनियांशी झालेले चर्चा बाहेर करुन त्यांनी मर्यादा ओलांडल्यात अशी टीका काँग्रेसनं केली. काँग्रेसच्या टीकेमुळे व्यथित झालेल्या समाजवादी पक्षाने काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसची भूमिका चुकीची आहे. मोठ्या पक्षांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप रामगोपाल यादव यांनी केली. पण अजूनही चर्चेची दारं बंद नाही असंही ते म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन युपीएच्या निर्णायाला पाठिंबा दिला आहे. उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

close