उद्योग बाहेर चाललेत हा गैरसमज – मुख्यमंत्री

June 15, 2012 2:21 PM0 commentsViews: 3

15 जून

महाराष्ट्रातून उद्योग बाहेर चाललेत उद्योजक नाराज आहेत ही टीका गैरसमजुतीमधून होत असल्याचा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगधंद्याच्या धोरणावरून राज्य सरकारला आणि विशेष करून मुख्यमंख्यमंत्र्यांना टीकेचं लक्ष्य केलं होतं. चव्हाण यांनी उत्कृष्ट पायाभूत सुविधांमुळे महाराष्ट्र हीच उद्योजकांची प्रथम पसंती आहे याचा निर्वाळा देताना प्रत्येक नवा प्रकल्प महाराष्ट्रातच येईल असा आग्रह धरणं योग्य ठरणार नाही असंही सांगितलं.

पुण्यातील चाकण येथे जनरल इलेक्ट्रीकल कंपनीतर्फे 1000 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यात येत असून 2000 जणांना रोजगार मिळणार आहे. राज्य सरकार आणि जी. इ कंपनीमधे यासंबंधीचा करार करण्यात आलाय यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मनसेतर्फे सध्या सुरू असलेल्या टोलविरोधी आंदोलनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्यानं प्रत्येक टोल नाक्यावर किती टोल वसूल झाला. , एकूण वाहन संख्या, किती टोल वसुली बाकी आहे याचा तपशील इलेक्ट्रॉनिक बोर्डावर सादर करायचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचं सांगून टोलवसुलीमध्ये अधिक पारदर्शकता आणू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

close