आमिरच्या ‘त्या’ प्रमाणपत्राबाबत चौकशी सुरु

June 15, 2012 2:51 PM0 commentsViews: 5

15 जून

अभिनेता आमिर खानच्या नावाने बनावट उत्पन्नाचे प्रमाणपत्र बनवणार्‍या दलालांच्या कारभारामुळे आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. नागपूरच्या तहसील कार्यालयात दलालांच्या माध्यमातून उत्पन्नाचे दाखले दिले जात असल्याची बातमी आयबीएन लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर आता प्रशासनाला कारवाईला सुरुवात केली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले असून दलालांवर अंकुश ठेवण्यासाठी कार्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नागपूरच्या तहसील कार्यालयात चक्क अभिनेता आमीर खानच्या नावानंच उत्पन्नाचा दाखला देण्यात आल्याचा प्रकार काल उघडकीस आला. या प्रमाणापत्रासाठी आमीरचं वार्षिक उत्पन्न 36 हजार रुपये दाखवण्यात आलंय. विशेष म्हणजे या प्रमाणपत्रावर आमीर खानचा फोटो सुध्दा आहे. ऍडमिशनसाठी लागणारी प्रमाणपत्रं झटपट देण्यासाठी दलालांकडून हा प्रकार घडल्याचं समोर आलंय. प्रत्येक प्रमाणपत्रासाठी 300 ते 400 रुपये घेऊन 'सेटिंग' करुन ताबडतोब प्रमाणपत्र दिली जात असल्याचं उघडं झालंय. त्यातूनच हा प्रकार घडला.

close