शिवसेनेच्या नगरसेवकाने ‘पाणी चोरुन दाखवलं’

June 15, 2012 4:21 PM0 commentsViews: 4

15 जून

कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणावर उघडउघड पाणीचोरी केली जात आहे. आणि महत्वाचं या पाणीचोरीमागे आहे शिवसेनेचे नगरसेवक आणि त्यांच्या पत्नी. कल्याण डोंबिवली महापालिकेला पाणीपुरवठा करणार्‍या एमआय डी सी च्या पाईपलाईनमधून बेकायदेशीर 6 पाईपलाईन्स टाकून राजरोसपणे ही पाणी चोरी करण्यात येत आहे. शिवसेनेचे नगरसेवक भुल्लर सिंग महाराज आणि त्यांच्या पत्नी नगरसेविका चरणजित कौर यांच्या मदतीने ही पाण्याची चोरी होतंय.आणि हे चोरीचं पाणी बेकायदेशीर झोपडपट्‌ट्या आणि बांधकामांना पुरवण्यात येत आहे.

close