14 तेल उद्योगांमधले कर्मचारी 2 डिसेंबरपासून संपावर

November 25, 2008 2:23 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर सरकार तेल कंपन्यांची नाराजी अजून दूर करू शकले नाही. याचा परिणाम म्हणून 14 सार्वजनिक तेल उद्योगांमधले कर्मचारी 2 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जात आहेत. सरकारनं दिलेली वेतनवाढ समाधानकारक नसल्याचं या कर्मचा-यांच म्हणणं आहे. त्यांच्या या संपाचा परिणाम विमानतळांवरील हवाई इंधनाच्या व्यवस्थेवर, पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि सीएनजीच्या पुरवठ्यावर होणार आहे. तसंच बॉम्बे हायमधील उत्पादनालाही या संपाचा फटका बसू शकतो. सरकार जरी 300% वाढ दिल्याचं दाखवत असलं तरी प्रत्यक्षात मात्र 30% वेतनवाढ मिळाली असल्याची या कर्मचा-यांची तक्रार आहे.

close