पोटनिवडणुकीत रेड्डींनी दिला काँग्रेसला धक्का

June 15, 2012 4:08 PM0 commentsViews: 4

15 जून

आंध्रप्रदेशात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसला जबरदस्त धक्का दिला आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसनं 18 पैकी तब्बल 15 जागा जिंकल्या आहे. काँग्रेसला केवळ 2 जागा जिंकता आल्यात, तर तेलंगणा राष्ट्र समितीला एक जागा मिळाली आहे. तेलुगू देसम पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही. नेल्लोर लोकसभेची जागाही वायएसआर काँग्रेसनं जिंकली आहे. वायएसआर काँग्रेसच्या उमेदवारानं इथून तब्बल 2 लाखांच्या वर मतांनी विजय मिळवला. काँग्रेसच्या 18 आमदार आणि प्रजाराज्यमच्या एका खासदाराने वायएसआर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने याठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. 2009 मध्ये या 18 पैकी 16 जागा काँग्रेसनं जिंकल्या होत्या. पोटनिवडणुकीच्या तोंडावरच बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी जगनमोहन रेड्डींना अटक केली होती. ते अजूनही जेलमध्ये आहेत.

close