प्रणवदांच्या नावावर शिक्कामोर्तब;सपा,काँग्रेसची डील ?

June 15, 2012 9:29 AM0 commentsViews: 4

15 जून

राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीनं आज महत्त्वाचा दिवस आहे. सकाळपासून हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रपती पदासाठी समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळावा, यासाठी काँग्रेस आणि मुलायम सिंग यादव यांच्यात डील झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इतकंच नाही तर बहुजन समाज पक्ष अध्यक्ष मायावती यांचाही पाठिंबा काँग्रेसला असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आज संध्याकाळी यूपीएच्या बैठकीत प्रणव मुखर्जी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी शक्यता आहे. आज संध्याकाळी काँग्रेसची 4 वाजता बैठक होणार आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा कलाम हेच आमचे उमेदवार असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. इतकंच नाही तर त्यांनी आधीच कलाम यांना शुभेच्छाही दिल्या. गेल्या दोन दिवसांपासून त्या दिल्लीत होत्या. पण त्यांनी राष्ट्रपती पदासाठी सुचवलेल्या नावांवर काँग्रेसनं सध्या तरी असहमती दाखवली आहे. त्या आज पश्चिम बंगालला रवाना झाल्या. त्यामुळे त्यांची पुढची रणनीती काय असेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close