केज पोटनिवडणुकीत मुंडेंना धक्का, राष्ट्रवादीचे साठे विजयी

June 15, 2012 10:33 AM0 commentsViews: 17

15 जून

बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या संगीता ठोंबरेंचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीचे पृथ्वीराज साठे यांना 85 हजार सातशे 50 मतं मिळाली तर भाजपच्या संगीता ठोंबरे यांना 77 हजार सातशे 44 मतं मिळाली. साठे यांचा 8 हजार तीनशे सहा मतांनी विजय झाला. माजी मंत्री डॉ विमल मुंदडा यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी एनसीपीचे आठ मंत्री आणि 20 आमदार आठ दिवस केजमध्ये तळ ठोकुन होते. तर गोपीनाथ मुंडेंही प्रचारात होते त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र अखेरीस राष्ट्रवादीने बाजी मारत मुंडेच्या गडाला भगदाड पाडले आहे.

close