बहुमताचं गणित सुटलं ; राष्ट्रपती प्रणवदाच !

June 16, 2012 9:38 AM0 commentsViews: 4

16 जून

प्रणव मुखर्जी नवे राष्ट्रपती होणार हे आता जवळपास निश्चित आहे. सपा आणि बसपाच्या पाठिंब्यानंतर मुखजीर्ंकडे 49 टक्के मते आहेत. त्यांना आता केवळ 2 टक्के मतं हवी आहेत. बीजेडी आणि तृणमूल काँग्रेस जरी कलाम यांच्या नावावर ठाम असले, तरी एपीजे अब्दूल कलाम लवकरच माघार घोषित करण्याची शक्यता आहे. पी ए संगमा मात्र निडवणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे मुखर्जी विरुद्ध संगमा अशी लढत होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे निवडणूक लढवायची की नाही, यावरून एनडीएत संभ्रमात आहे. एनडीएनने निवडणूक लढवावी, अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. राष्ट्रपतीपदासाठी 5,87,351 मत आमच्याकडे आहेत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यामुळे प्रणवदा राष्ट्रपती बनणार हे निश्चित झाले आहे.

मतांची टक्केवारीयूपीए + समर्थक ( तृणमूल वगळता) – 49%यूपीए + समर्थक + डावे ( तृणमूल वगळता) – 54%यूपीए + समर्थक + डावे + जेडीयू ( तृणमूल वगळता) – 58%यूपीए + समर्थक + डावे + एनडीए ( तृणमूल वगळता) – 82%

close