पाच हजारात विकत आणलेल्या 108 बालमजुरांची सुटका

June 15, 2012 10:10 AM0 commentsViews: 82

15 जून

परराज्यातून पाच पाच हजार रुपयांना निष्पाप मुलांना विकत आणून त्यांना मुंबईत कामाला जुंपण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा खात्याच्या अधिकार्‍यांनी आग्रीपाडा भागात कारवाई करत सुमारे 108 बालकामगारांची सुटका केली आहे. ही सर्व मुलं उत्तरप्रदेश,बिहार, झारखंड, या राज्यांमधली आहेत. तर काही मुलं नेपाळमधली असल्याचंही उघड झालं आहे. यामागे मोठ रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अजून कोणाला अटक करण्यात आली नाही. पण ही सगळी मुलं कोणी आणली ? कुठे कामासाठी विकणार होते याचा तपास पोलीस करत आहे.

close