माऊलींची पालखी आज पार करणार दिवेघाट

June 15, 2012 10:30 AM0 commentsViews: 7

15 जून

माऊली आणि तुकोबांच्या पालख्यांनी पुण्यातला दोन दिवसांचा मुक्काम आटोपून आज पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान ठेवलं आहे. माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ झाली, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरकडे मार्गस्थ झाली. माऊलींची पालखी आज अवघड दिवेघाटाची चढण पार करणार आहे. घाटातून पालखी जाताना वारकर्‍यांच्या उत्साहाला उधाण येतं. हा सोहळा पाहण्यासाठी सकाळपासूनच वारकरी पूर्ण दिवेघाटात जागा धरून बसतात. दुपारी 3 ते 4 च्या सुमारास माऊलींची पालखी दिवेघाटात येणार आहे. त्याआधी पायथ्याशी माऊलींच्या रथाला बैलजोड्या जोडल्या जातील. अजूनही पाऊस न आल्यानं वारकर्‍यांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहे. तुकोबंाची पालखी हडपसरला विसावा घेतल्यानंतर लोणी काळभोरच्या मुक्कामाकडे रवाना होईल.

close