पेस सोबत खेळायला भुपतीचा नकार

June 16, 2012 10:03 AM0 commentsViews: 42

16 जून

पेस-भुपती या नावाने गेली कित्येक दिवस टेनिस कोर्टवर भारताचे वर्चस्व करणार्‍या जोडीचा वाद विकोपाला गेला आहे. भुपतीने पेस सोबत खेळण्यास नकार दिला असून भारतीय टेनिस टीमच्या मिशन ऑलिम्पिकला धक्का बसला आहे. महेश भुपतीनं लंडन ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत लिअँडर पेससोबत खेळण्यास नकार दिला आहे. पेस ऐवजी आपल्याला रोहन बोपण्णा सोबत खेळायचंय असं महेश भुपतीनं भारतीय टेनिस संघटनेला कळवलंय. यावर मार्ग काढण्यासाठी संघटनेनं बंगलोर येथे तातडीची बैठक बोलावली आहे. भुपती आणि रोहण बोपण्णा आपल्या मतावर ठाम राहील्यास दोघांवरही संघटना दोन वर्षासाठी बंदी ठोठावू शकते.

close