अखेर ‘ममता’झुगारुन, प्रणवदा मैदानात

June 15, 2012 11:48 AM0 commentsViews: 3

15 जून

गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरुन सुरु असलेली रस्सीखेच अखेर थांबलीय. प्रणव मुखर्जी हेच राष्ट्रपती होणार हे आता जवळपास निश्चित झालंय. युपीएचे अधिकृत उमेदवार म्हणून सोनिया गांधी यांनी आज त्यांच्या नावाची घोषणा केली. मुखजीर्ंच्या नावाला तृणमूल वगळता यूपीएच्या सर्व घटकपक्षांनी पाठिंबा दिला. त्यानंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानंही प्रणवदांना आपला पाठिंबा जाहीर केला. गेल्या दोन दिवसांपासून ममतांशी केलेली मैत्री मुलायमनी आज तोडली.

त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी एकाकी पडल्यात. त्या अजूनही एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावावर ठाम आहेत. आता त्या यूपीएमध्ये राहणार की बाहेर पडणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ममता आपल्या बहिण्यासारख्या आहेत, आणि त्यांनी पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा प्रणव मुखजीर्ंनी व्यक्त केली. डाव्या पक्षांनी प्रणव मुखजीर्ंचं अभिनंदन केलंय. पण पाठिंब्याबाबतचा निर्णय ते 21 जूनच्या बैठकीत घेणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीपीआयचे नेते ए. बी. बर्धन यांची भेट घेऊन प्रणवदांना पाठिंबा देण्याची विनंती केली.

भाजपनं मात्र यूपीएच्या घोषणेवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी यांचं नाव घोषित करण्यापूर्वी काँग्रेसनं विरोधकांनाही विश्वासात घ्यायला हवं होतं, असं भाजपनं म्हटलंय. प्रणव मुखजीर्ंचं नाव जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्याशी फोनवरून बातचीत केली. आणि त्यांना पाठिंब्याचं आवाहन केलं. आता प्रणवदा अर्थमंत्रीपदाचा 24 जूनला पदाचा राजीनामा देऊन 25 ला राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल करणार आहे.

close