माऊलींच्या पालखीचा मुक्काम सासवडमध्ये

June 16, 2012 10:13 AM0 commentsViews: 5

16 जून

माऊलींच्या पालखींचा आजचा मुक्कामही सासवडमध्येच असणार आहे. आज सासवडमध्ये ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे बंधू सोपानकाका यांच्या भेटीचा सोहळा वारकर्‍यांना अनुभवायला मिळतो, त्या सोहळ्यासाठी वारकरी मोठ्या संख्येनं हजर असतात. या बंधुभेटीनंतर सोपानकाकांची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तर तुकारामांची पालखी लोणी कालभेर वरुन यवधच्या दिशेनं निघाली. आज संध्याकाळी यवधला पालखीचा मुक्काम असणार आहे. संपूर्ण रस्त्यात पालखीला गोडाधोडाचा नैवद्य करण्यात येतो, पण यवधला मात्र तुकारामांच्या पालखीला पिठलं भाकरीचा नैवद्य दिला जातो. तसेच गावातल्या प्रत्येक घरातही पिठलं भाकरीच केली जाते.

close