दूध टँकरची टोल नाक्यांवर तपासणी

June 16, 2012 8:19 AM0 commentsViews: 6

16 जून

गेल्या महिन्यापासून राज्यात दूध भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनानं कल रात्री मुंबईच्या सर्वच जकात नाक्यावर दूध तपासणी केली. वाशीच्या जकात नाक्यावर तर मिनी प्रयोगशाळाचं उभी केली. वाशी नाक्यावर दुधाच्या टँकरची तपासणी केली गेली मात्र भेसळीचा प्रकार आढळला नाही. मात्र यापुढेही ही तपासणी सुरुचं राहणार असल्याचं अन्न प्रशासन अधिकारी महेश झगडे यांनी म्हटलं आहे. या अगोदर खार पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन खात्याने संयुक्त कारवाई करत खारदांडा भागात 5 ते6 घरांवर छापा टाकला होता. या छाप्यात 400 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं. तसेचे पाच जणांना अटक करण्यात आली होती.

close