राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढणार नाही – कलाम

June 18, 2012 10:17 AM0 commentsViews: 101

18 जून

मला राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढायची नाही. मला अनेक राजकीय पक्षांनी,नेत्यांनी विनंती केली. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत मी त्यांचा आभारी आहेत तसेच तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी जो विश्वास दाखवला त्यांचे मी आभार मानतो पण मी 2012 ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे असं स्पष्टीकरण एपीजे अब्दूल कलाम यांनी आज एका निवेदनातून जाहीर केलं. कलाम यांच्या या निर्णयामुळे आता एनडीए आणि तृणमूलला धक्का बसला आहे. कलाम यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी यासाठी एनडीएने मोर्चेबांधणी सुरु केली होती यासाठी आज सुधींद्र कुलकर्णी यांनी कलाम यांची दोन वेळा भेट घेतली. ममतादीदींनीही कलाम एक नंबरचे उमेदवार आहे असं जाहीर करत फेसबुकवर मोहीम उघडली होती. आता कलाम यांनीच नकार दिल्यामुळे सर्व चर्चेवर पडदा पडला आहे.

कलाम म्हणतात

पुन्हा राष्ट्रपतीपदी बसण्याची माझी इच्छा नव्हती किंवा मी निडवणुकीत रसही दाखवला नव्हता. पण ममता बॅनर्जी आणि इतर राजकीय पक्षांची इच्छा होती की मी उमेदवार म्हणून उभं राहावं. मी या संपूर्ण विषयाचा विचार केला, राजकीय परिस्थिती जाणून घेतली आणि निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतलाय. – अब्दुल कलाम.

close