औरंगाबादेत तब्बल दोन किलो सोनं चोरट्यांनी पळवले

June 16, 2012 12:14 PM0 commentsViews: 1

16 जून

औरंगाबादेत तब्बल दोन किलो सोनं आणि 2 लाख 80 हजार रूपयांची कॅश चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे. उस्मानपुरा परिसरातील जी. एस. जग्गी या बांधकाम व्यावसाईकांच्या घरात ही चोरी झाली. घरात दुरूस्तीचं काम चालू असल्यानं जग्गी यांनी सर्व सामान बेडरूममध्ये हलवलं आणि घरासाठी काही सामान खरेदी करण्याच्या निमित्तानं जग्गी आणि त्यांची पत्नी पुण्यात गेलेले असताना हा प्रकार घडल्याच समोर आलंय. हा प्रकार घडला तेव्हा घरात जग्गी यांची आई होती. सकाळी मोलकरीण कामाला आली असताना तीला बेडरूमचा दरवाजा आणि घरातील कपाटं उघडी दिसली. तीनं तात्काळ ही बाब जग्गी यांना कळवली. उस्मानपुरा पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत. या प्रकरणी जग्गी यांच्या घरात घर दूरुस्तीच्या बांधकामासाठी असलेल्या काहींची चौकशी करण्यात येत आहे.

close