पाठिंब्यासाठी प्रणवदांचा बाळासाहेबांना फोन ; भाजप नाराज

June 18, 2012 11:48 AM0 commentsViews: 5

18 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा परिणाम राज्यातल्या शिवसेना भाजप युतीवर होण्याची शक्यता आहे. प्रणव मुखर्जी यांनी काही वेळापूर्वीच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. शिवसेनेनं मात्र कोणताही निर्णय अजून घेतला नाही. तर दुसरीकडे मित्रपक्ष भाजपने शिवसेनेच्या भूमिकेबद्दल संशय आणि नाराजी व्यक्त केली. सेनेनं मुखर्जी यांना पाठिंबा दिला, तर आश्चर्य वाटणार नाही. पण यामुळे महाराष्ट्राची जनता नाराज होईल असं प्रदेशाध्यक्ष मुनगंटीवार यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना म्हटलं आहे.

close