आता काँग्रेसचे कांदा पोहे

November 25, 2008 6:03 PM0 commentsViews: 8

25 नोव्हेंबर, मुंबईसुवर्णा दुसाणे शिवसेनेनं शिववडा पाव सुरू केलाय तर आता काँग्रेसच्यावतीनं महाराष्ट्रीयन कांदा पोहे सुरू करणार असल्याचं महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी जाहीर केलंय. त्यासंदर्भात कृपाशंकर सिंह यांच्याशी चर्चा केलीय तर या योजनेचा आराखडा मुखमंत्र्यांकडे लवकरच सादर करू, असंही राजहंस सिंह यांनी सांगितलंय. नुकताच शिवसेनेनं शिववडापाव सुरू केलाय. शिववडयाला शह देण्यासाठीच काँग्रेस महाराष्ट्रीयन कांदेपोहे सुरू करत असल्याचं बोललं जातय. येत्या काळात पुन्हा शिववडा आणि कांदे पोहे यावरुन राजकारणं रंगल तर आश्चर्य वाटायला नको.

close