रोहन बोपण्णाचाही भुपतीला नकार

June 18, 2012 1:37 PM0 commentsViews: 2

18 जून

भारतीय टेनिसमधील वाद आता आणखी चिघळला आहे. महेश भुपतीपाठोपाठ आता रोहन बोपण्णानंही आता बंडाचं निशाण फडकावलंय. लंडन ऑलिम्पिकमध्ये लिअँडर पेससोबत खेळण्यास नकार दिला आहे. महेश भुपतीनं दुहेरीत पेस सोबत खेळण्यास नकार दिल्यावर भारतीय टेनिस संघटनेनं रोहन बोपण्णाला खेळण्यास सांगितलं होतं. पण त्यानंही आज भारतीय टेनिस संघटनेला आपला लेखी नकार कळवला आहे. भारतीय टेनिसपटूंची नावं लंडन संयोजन समितीला कळवण्याची 21 जून ही शेवटची तारीख आहे.बोपण्णानंही खेळण्यास नकार दिल्यास त्याच्यावर दोन वर्षांसाठी खेळण्याची बंदी येऊ शकते.

close