दया नायक पुन्हा पोलीस सेवेत

June 16, 2012 4:26 PM0 commentsViews: 13

16 जून

निलंबित असलेले एनकाऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना पुन्हा मुंबई पोलीस दलात कार्यरत करण्यात आले आहे. जवळपास साडेसहा वर्षाआधी पोलीस सब इन्स्पेक्टर दया नायक याना गृह खात्याने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. दया नायक यांना आज मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागात नियुक्त करण्यात आले. दया नायक यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.

2006 साली अँटी करप्शन विभागाने दया नायक यांच्या अटकपूर्व जामीन कोर्टाने रद्द केल्यानंतर अटक केली होती. 2009 मध्ये तत्कालीन पोलीस महानिरक्षक एस एस विर्क यांनी दया नायक यांच्या विरुद्ध खटला चालवण्यास परवानगी नाकारली होती. नायक विरुद्ध कुठलेही पुरावे नसल्याचही विर्क यांनी सांगितले होते. यानंतर नायक यांची या प्रकरणाची फाईल अँटीकरप्शन ब्युरोकडे पाठवण्यात आली होती. नायक यांना पुन्हा पोलीस दलात पुन्हा येण्यासाठी नवा मार्ग निर्माण झाला.

दया नायक यांच्या विरोधात आता कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यासंदर्भातील आदेश मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी काढले त्यानुसार नायक यांनी आज पदभार स्विकारला. 1995 बॅचचे अधिकारी असणारे दया नायक यांनी सात वर्षापुर्वी कर्नाटकमधील त्यांच्या गावात त्यांच्या आईच्या नावाने शाळा काढली होती त्याचे उद्घाटन अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले होते. अँटीकरप्शन ब्युरोने नायक यांच्यासह त्यांच्या दोन मित्रांनाही अटक केली होती. या दोन मित्रांनी आपली संपत्ती नायक यांच्या नावे केल्याच नंतर त्यांनी कोर्टाला सांगितले होते. अँटीकरप्शन ब्युरोने दया नायक यांची पत्नी कोमल यांनाही अटक करण्याची मागणी केली होती.

close