सुनील तटकरेंविरोधात याचिका दाखल

June 18, 2012 8:46 AM0 commentsViews: 6

18 जून

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राजेंद्र फणसे यांनी ही याचिका दाखल केली आहे. तटकरे यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने 140 कंपन्या स्थापन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच गृहखात राष्ट्रवादीकडे असल्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे आणि तटकरेंच्या संपत्तीची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. शेकापचे जयंत पाटील, महाजन आणि देवेंद्र फडवणवीस यांच्या आरोपांच्या आधारे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता 21 तारखेला म्हणजे गुरुवारी सुनावणी होणार आहे.

जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी त मुलगा, मुलगी, सून आणि काही कर्मचार्‍यांच्या नावावर तब्बल 140 कंपन्या स्थापन करण्यात आल्याची माहिती आयबीएन लोकमतच्या हाती लागली. कॉर्पोरेट अफेअर्स मिनिस्ट्रीकडूनच याबाबतची माहिती उपलब्ध झालीय. विशेष म्हणजे या कंपन्या तटकरे मंत्री असतानाच्या काळात उघडण्यात आल्या आहेत. केवळ कंपन्या स्थापन करून हे सर्व जण थांबले नाहीत, तर या कंपन्यांच्या नावावर शेकडो एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तटकरे यांचा मतदारसंघ असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यात या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर त्यासाठी आठशे एकर जागा विकत घेतली असा गंभीर आरोप होत आहे. सुनील तटकरे यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहे. पण सुनील तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे यंाच्या मल्टीव्हेंचर कंपनीसाठी जमीन खरेदी करताना महसूल व्यवस्था दावणीला बांधण्यात आली.अनिकेत तटकरेंसाठी जमीन खरेदी

- अनिकेत तटकरे संचालक असणारी मल्टीव्हेंचर प्रा. लि. कंपनी- 23 गुंठे शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी- कुठवहीवाट आणि शेतजमीन अधिनियम 63 अंतर्गत- अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली- 25 मे 2009 रोजी परवानगी पत्रं दिलं- प्रत्यक्षात खरेदी खतं झाली 2 महिने आधी 27 एप्रिल 2009 ला- खरेदी खतं होण्याआधीच सातबारावर नावं चढली होती – नवे सातबारा तयार होते 4 मार्च 2009 ला- सर्वे नं 16/1 ब साठी ही परवानगी देण्यात आली- पण प्रत्यक्षात खरेदी झाली ती सर्वे नं 37 च्या जमिनीची- 23 गुंठे शेतजमिनीच्या खरेदीची परवानगी मिळाली- 5 हेक्टर 22 गुंठे जमिनीची खरेदी झाली- रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कलेक्टरच्या सहीचं चुकीचं पत्र सादर – पत्राआधारे खरेदी प्रक्रियेची नोंदणी पूर्ण- रजिस्ट्रार ऑफिसमधूनही कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही.

close