कतिल हत्येप्रकरणी 4 अधिकारी निलंबित

June 18, 2012 11:00 AM0 commentsViews: 1

18 जून

पुण्यात येरवडा जेलमध्ये मोहम्मद कतिल या आरोपीची हत्या झाली होती. या प्रकरणी ऍडिशनल डीजी (जेल) प्रकाश पवार यांना निलंबित करण्यात आलंय. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांच्यासोबत त्यावेळी ड्यूटीवर असलेले इतर चार जेल अधिकारीही निलंबित करण्यात आले आहे. कतिल हा इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित अतिरेकी होता. पुण्यात जर्मन बेकरीत झालेल्या आणि बंगलोरमधल्या बाँबस्फोट प्रकरणांतला तो आरोपी होता.

close