‘आदर्श प्रकरणी 10 दिवसांत आरोपपत्र सादर करणार’

June 18, 2012 9:01 AM0 commentsViews: 2

18 जून

आदर्श सोसायटी घोटाळाप्रकरणी सर्व 14 जणांविरूध्द सीबीआयने 10 दिवसात आरोपपत्र दाखल करणार अशी ग्वाही सीबीआयने हायकोर्टात दिली. 15 जून ही आरोपपत्र दाखल करण्यासाठी शेवटची तारीख होती, पण सीबीआयनं या वेळेत आरोपपत्र दाखल केलेलं नाही. तसेच मुदत वाढवून देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली होती. कोर्टाने सीबीआयला 10 दिवसांची मुदत वाढवून देत 29 जूनला आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिलेत.सीबीआयने आरोपपत्र दाखल केले नसल्यामुळे सगळे आरोप आज तुरुंगाबाहेर आहे. याप्रकरणी 4 जुलैला सुनावणी होणार आहे. दरम्यान, सीबीआयच्या तपासाला राज्य सरकारची संमती नसल्याचा दावा आदर्श सोसायटीच्या वकीलांनी आज कोर्टात केला आहे. या दाव्याला सरकारी वकीलांनीही दुजोरा दिला आहे.

close