इचलकरंजीत आरोग्यमंत्र्यांच्या पुतळ्याचं दहन

June 18, 2012 9:46 AM0 commentsViews: 5

18 जून

इचलकरंजीमध्ये सुरु असलेल्या काविळच्या साथीकडं प्रशासनानं योग्य पध्दतीनं उपाय न केल्यानं शिवसेनेनं आज आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी आणि पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचं दहन केलं. सेना कार्यकर्त्यांनी सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करुन आरोग्यमंत्र्याचा निषेध केला.आणि याच हॉस्पिटलच्या आवारात पुतळ्याचं दहन केलं. काविळच्या साथीनं आतापर्यंत 16 नागरीकांचा मृत्यू झालाय. प्रशासनाचं दुर्लक्ष त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केलाय.

close