टोलविरोधात मनसेचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलले

June 18, 2012 5:17 PM0 commentsViews: 3

18 जून

टोल नाक्यांचा हिशेब तपासण्यासाठी मनसेचं राज्यभर सुरू होणारं आंदोलन एक दिवस पुढं ढकलण्यात आलं आहे. आता उद्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे. पूर्व तयारीसाठी थोडा वेळ हवा असल्यानं आंदोलन एका दिवसासाठी पुढं ढकलण्यात आल्याचं मनसेनं म्हटलं आहे. कंत्राटदार खोटी माहिती देतात असा आरोप करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाची घोषणा केली होती. प्रत्येक टोल नाक्यावर मनसेचे 50 कार्यकर्ते 15 दिवस गाड्यांची मोजणी करणार आहेत. या कार्यकर्त्यांना कंत्राटदारांकडून त्रास झाल्यास त्याचे राज्यभर परिणाम होतील असा इशाराही राज यांनी दिला होता. त्यामुळे हे आंंदोलन कसं पार पडतं याकडं सगळ्यांचं लक्षं लागलंय. दरम्यान, मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसा बजावून ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे.

close