काविळीच्या मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत

June 19, 2012 9:58 AM0 commentsViews: 7

19 जून

कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीत काविळीच्या साथीनं थैमान घातलं आहे. काविळीच्या साथीने आतापर्यंत 21 जणांचा बळी गेला आहे. काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज सरकारने तातडीने 25 लाखांची औषधं जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरूपी आयसीयू उभारण्यासाठी लागणार्‍या निधीलाही सरकारनं तत्वतः मान्यता दिली. दरम्यान, काविळाच्या साथीनं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज इचलकरंजीत येऊन हॉस्पिटलची पाहणी केली रुग्णांना विचारपुस केली. पण खुद्द मुख्यमंत्री रुग्णांनी भेटी देत असतांना आरोग्यमंत्री गैरहजर होते.

close