ट्रक अपघातात 9 वारकरी ठार, 6 जखमी

June 19, 2012 10:06 AM0 commentsViews: 7

19 जून

पंढरपूरकडे निघालेल्या बारामतीमधील दिंडीचा ट्रकला नीरा नदीच्या पुलावर अपघात झाला. आज पहाटे तीनच्या सुमारास नीरा नदीच्या पूलावरून ट्रक कोसळून 9 वारकरी ठार झाले तर 6 वारकरी जखमी झाले आहे. ट्रक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना ही घटना घडली. अपघातातील जखमीना लोणंदच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. तर मृतांना जेजूरीच्या शासकीय रूग्णालयात नेण्यात आलंय. अपघातातील सर्व जखमी आणि मृत हे बारामती तालुक्यतील कांबळेश्वर इथल्या गणपती गोसावी महाराज यांच्या दिंडीतील वारकरी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मृतांच्या वारसांना 1 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

close