2014 पूर्वी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवा – नितीशकुमार

June 19, 2012 11:03 AM0 commentsViews: 6

19 जून

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून भाजप एकाकी पडलेला असतानाच आता पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरूनही भाजपला धक्का बसला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावर वादाला तोंड फोडलंय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून अमान्य आहेत असे स्पष्ट संकेत नितीशकुमार यांनी दिलेत. 'इकॉनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एनडीएनं 2014 च्या निवडणुकीपूर्वी आपला उमेदवार जाहीर करावा अशी मागणी केली. आणि हा उमेदवार धर्मनिरपेक्ष आणि मुक्त विचारांचा हवा, असं म्हटलंय. नितीशकुमार यांनी मोदींचं नाव घेणं टाळलं असलं तरी संयुक्त जनता दलाचे नेते देवेशचंद्र ठाकूर यांनी मात्र मोदींना उघड विरोध केला. शिवसेनेनंही नितीशकुमार यांच्या मताचं समर्थन केलंय.2014 पूर्वी एनडीएनं सर्वसहमतीनं उमेदवार निवडावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. काँंग्रेसनं नितीश कुमारांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. तर एनडीएत धर्मनिरपेक्ष चेहरा आहेच कुठे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

close