कोल्हापुरात इतर तालुक्यात काविळची साथ पसरली

June 20, 2012 9:36 AM0 commentsViews: 2

20 जून

कोल्हापुर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील काविळची साथ ही आता इतर तालुक्यामध्येही पसरु लागली आहे. कोल्हापूर शहरात 26, शिरोळ तालुक्यात 29, पाटपन्हाळे 6 तर इचलकरंजीमध्ये 15 नव्याने आढळले आहेत. इचलकरंजीतील जलवाहिनीची तपासणी सुरु करण्यात आली आहे. पण अजूनही प्रदुषित पाणी प्यायला लागत असल्याने काविळची साथ आटोक्यात येण्याची शक्यता दिसत नाही. काविळीच्या साथीने आतापर्यंत 21 जणांचा बळी गेलाय. काविळीची साथ आटोक्यात आणण्यासाठी राज सरकारने तातडीने 25 लाखांची औषधं जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली. कायमस्वरूपी आयसीयू उभारण्यासाठी लागणार्‍या निधीलाही सरकारनं तत्वतः मान्यता दिली. तसेच काल मंगळवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काविळाच्या साथीनं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांच्या मदतीची घोषणा केली.

close