हिंदुत्ववादी व्यक्ती पंतप्रधान का नको?- मोहन भागवत

June 20, 2012 9:57 AM0 commentsViews: 4

20 जून

भारत देश हा हिंदुत्वाचार आहे. मग पंतप्रधानपदी हिंदुत्ववादी व्यक्ती का नको ? असा सवाल सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित करत नितीशकुमार यांना फटाकारले. पंतप्रधानपदासाठीची व्यक्ती धर्मनिरपेक्ष असावी असं मत व्यक्त करत नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नावाला आक्षेप घेतला होता. सरसंघचालकांनी नितीशकुमारांना फटाकारत नरेंद्र मोदींचा मार्ग मोकळा केलाय. काल मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण यावर वादाला तोंड फोडलंय. नरेंद्र मोदी एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून अमान्य आहेत असे स्पष्ट संकेत नितीशकुमार यांनी दिलेत. 'इकॉनॉमिक टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एनडीएनं 2014 च्या निवडणुकीपूर्वी आपला उमेदवार जाहीर करावा अशी मागणी केली. आणि हा उमेदवार धर्मनिरपेक्ष आणि मुक्त विचारांचा हवा, असं म्हटलं होतं. आज लातूरमध्ये संघाच्या एका मार्गदर्शन शिबिरात सरसंघाचालक मोहन भागवत यांनी नितीशकुमारांवर टीका केली. हिंदुत्ववादी पंतप्रधान का नको ? हिंदुत्व हे संकुचित नाही. हम भी सही, तुम भी सही अशी आमची भूमिका आहे. तसेच नितिश कुमारांच्या वक्तव्यामागे राजकारण आहे असा आरोपही भागवत यांनी केला.

close