मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी लंडनमध्ये राहिल शेखला अटक

November 25, 2008 7:39 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर लंडनमुंबईत 11 जुलै 2006 मध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटप्रकरणी लंडन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राहिल शेख असं त्याचं नाव आहे. या बॉम्बस्फोटासाठी त्यानं आर्थिक मदत दिल्याचा आरोप आहे. राहिल शेखबद्दल मुंबई पोलिसांनी इंटरपोलला माहिती दिली होती. त्याला वॉण्टेड म्हणून घोषित करण्यात आलं होतं. सध्या लंडन पोलीस सीबीआयच्या संपर्कात आहेत. राहील शेखला आठवड्याभरात भारतात आणण्यात येईल, अशी शक्यता आहे.

close