आजपासून टोल नाक्यांवर मनसेची ‘नजर’

June 19, 2012 5:37 PM0 commentsViews: 5

19 जून

टोल नाक्यांविरोधात मनसे पुकारलेल्या आंदोलनाचा आता दुसरा आध्याय आजपासून सुरु झाला. मागिल आठवड्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज मुंबईतील टोलनाक्यांवर 50 कार्यकर्ते नजर ठेवून आहे. किती गाड्या गेल्यात, किती टोलवसूल करण्यात आला याचा प्रत्येक हिशेब ठेवला जात आहे. आज सकाळी या आंदोलनाला दहिसर टोलनाक्यापासून सुरुवात झाली. यापाठोपाठ मुलुंड, खेड शिवापूर टोल नाक्यांवरही कार्यकर्ते नजर ठेवून आहे. यावेळी कार्यकर्त्यांना वाहन मोजण्यासाठी विशेष फॉर्म देण्यात आले आहे. यामध्ये ट्रक,कार,अवजड वाहन अशा प्रत्येक वाहनांचा तक्ता आखण्यात आलाय. टोल नाक्यावर वाहनांनुसार टोल घेत असल्यामुळे अशी मांडणी करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. वाशी टोलनाक्यावर सकाळी मोजणी करण्यात आली तेंव्हा 20 मिनिटात 300 वाहनं गेल्याची कार्यकर्त्यांचे म्हणणं आहे. आमदार प्रवीण दरेकर प्रत्येक टोल नाक्यावर कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन कामाचा आढावा घेत आहे.

close