संगमांचा राष्ट्रवादीला रामराम

June 20, 2012 4:35 PM0 commentsViews: 1

20 जून

राष्ट्रपतीपदासाठी आपल्या उमेदवारीचा ऐलान करणारे पी.ए.संगमा यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. आज संगमा यांनी पक्षाकडे आपल्या सदसत्वाचा राजीनामा सोपवला आहे. त्यांचा हा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारलाय. जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमण्यम स्वामी यांनी आज संगमा यांची घरी जाऊन भेट घेतली. यानंतर बाहेर येऊन पत्रकारांशी संवाद साधताना संगमा यांनी राजीनामा दिला असल्याचं जाहीर केलं. संगमा यांनी स्वामींकडे एक निवेदनाव्दारे आपण राजीनामा देत असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने राष्ट्रपतीपदासाठी प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संगमा यांच्यावर मागे हटण्याचा दबाव वाढत होता. मात्र संगमा यांनी राष्ट्रपती निवडणूक लढवणारच असा निर्धार केला. संगमा यांनी बीजेडी आणि अण्णा द्रमुकचा पाठिंबा आहे. आज संध्याकाळी एनडीएची बैठक होतं आहे. आता एनडीए आपला उमेदवार उभा करते की संगमांना पाठिंबा देते हे पाहण्याचं ठरेल.

close