राज्यात 2 दिवसांत गुटखाबंदी

June 20, 2012 10:37 AM0 commentsViews: 71

19 जून

गुटखा खाऊन भिंती रंगवण्यार्‍या गुटखा बहादुरांचे तोंड आता बंद होणार आहे. येत्या दोन दिवसांत राज्यभरात गुटखाबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न,औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी आयबीएन लोकमतला दिलीय. मॅग्नेशियम कार्बोनेट असलेल्या सर्व पदार्थांवर कडक बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्यात गुटख्याचं उत्पादन, विक्री आणि सेवन या सर्वांवर बंदी घालण्यात येईल. या निर्णयामुळे राज्य सरकारचं सुमारे 100 कोटी रुपयांचं महसुलीचं नुकसान होणार आहे. मॅग्नेशियम कार्बोनेट हा आरोग्याला अतिशय हानिकारक पदार्थ आहे. राज्यभरात कायमची गुटखा बंदीची औपचारीक घोषणा येत्या दोन दिवसात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहा दिवसांपुर्वी महसूल बुडाला तरी चालेल, पण राज्यात गुटखा, पानमसाल्यावर बंदी घालणार अशी घोषणा केली होती. लवकरच याबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार सांगितलं होतं.

close