महावितरणची वीज कडाडली

June 19, 2012 1:43 PM0 commentsViews: 49

19 जून

महागाईनं होरपळलेल्या जनतेला आता वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. महावितरणला तब्बल 1883 कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी वीज नियामक आयोगानं वीज दरवाढ करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे महावितरणची वीज आता पुढील सहा महिने प्रतियुनिट 22 पैसे ते 68 पैशांनी महागणार आहे. ही वसुली जून ते नोव्हेंबर या महिन्यांमध्ये सहा समान हप्त्यांमध्ये करण्याची अनुमती दिली गेली आहे. यानुसार प्रत्येक महिन्याला सुमारे 247 कोटी रुपयांची वसुली केली जाणार आहे. महावितरणच्या 1 कोटी 94 लाख ग्राहकांना या वीज दरवाढीचा फटका बसणार आहे.

close