विदर्भात पावसाचे धुमशान

June 20, 2012 8:28 AM0 commentsViews: 3

20 जून

विदर्भात पावसाने जोर धरला असून दोन दिवसांपासून अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या तीन जिल्ह्यातील नद्यांना पुर आला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील 800 आणि यवतमाळ मधील 374 घरांमध्ये पाणी शिरलंय. दिग्रसमध्ये धावडा नदीवरील पुल तुटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वर्धा जिल्ह्यात वर्धा नदीला पूर आल्याने पुलाचे बांधकाम साहित्य घेऊन गेलेले तीन ट्रक पाण्यात अडकले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चिचालीमध्ये लोअर वर्धाचे पाणी शिरल्याने नदी पार करतांना 14 मजूर अडकलेत. त्यांना बोटीने वाचवण्यात आलंय.

close