डॉ.कोल्हेंच्या हॉस्पिटलची पोलिसांकडून तपासणी

June 19, 2012 3:11 PM0 commentsViews: 2

19 जून

स्त्रीभ्रूण हत्येप्रकरणी परळीचं पोलीस पथक जळगांवला दाखल झालंय. डॉ.राहुल कोल्हे यांच्या पद्मावती हॉस्पिटलमधून त्यांनी 1 सोनोग्राफी मशीनही ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. परळीला स्त्री भ्रूण हत्या संदर्भात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी डॉ.सुदाम मुंडे यांचं जळगांव कनेक्शन म्हणून डॉ.राहुल कोल्हेला परळी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 25 जूनपर्यंत डॉ.कोल्हेंना परळी कोर्टान पोलीस कोठडी दिली आहे. बंद असलेल्या डॉ.कोल्हेच्या हॉस्पिटलमधील कागदपत्र आणि ज्या सोनोग्राफी मशीनद्वारे त्यांनी सोनोग्राफी केल्या आहेत ते मशीन पोलीस जप्त करणार आहे. पोलीस उपअधीक्षक स्वाती भोर, प्रकरणाचे तपासअधिकारी रामराव गाडेकर हे पथकासह डॉ.कोल्हेच्या ताब्यातील काही महत्त्वाच्या नोंदी आणि कागदपत्र या तपासणीत ताब्यात घेण्यात आहे.

close