भारत-इंग्लंडदरम्यानची पाचवी वनडे रंगणार

November 25, 2008 7:30 PM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर कटकपाचवी वनडे बुधावारी कटकमध्ये होणार आहे. डे-नाईट खेळवण्यात येणा-या मॅचमध्ये भारतीय टीमचंच पारडं जड आहे. तर इंग्लंडसमोर आव्हान आहे सीरिजमध्ये आणखी एक पराभव टाळण्याचं. धोणीची यंग ब्रिगेड सध्या चांगलीच फॉर्मात आहे. इंग्लंडविरुध्दच्या सात वनडेच्या सीरिजमध्ये भारतानं 4-0 अशी आघाडी घेत सीरिजमध्ये वर्चस्व निर्माण केलं आहे. आता भारतीय टीमचं लक्ष आहे ते कटकमध्ये होणा-या पाचव्या वनडेवर. टीमच्या जबरदस्त कामगिरीचं धोणीनं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर ही सीरिज 7-0 अशी जिंकण्याचा निर्धारही त्यानं केला आहे. इंग्लंडविरुध्दच्या सीरिजमध्ये भारताच्या जपळपास सर्वच खेळाडूंची कामगिरी जबरदस्त होतेय. पण असं असलं तरी कटक वनडेत काही खेळाडूंना विश्रांती देण्यात येईल. सीरिजमध्ये खेळू न शकलेल्या खेळाडूंना संधी देण्याचा भारतीय टीमचा विचार आहे.दुसरीकडे इंग्लंड टीमवरचा दबाव आणखीच वाढला आहे. सीरिजमध्ये 7-0 असा पराभव टाळण्यासाठी इंग्लंडला कटक वनडे जिंकावीच लागणार आहे. या सीरिजमध्ये इंग्लंडला दोनदा डकवर्थ लुईस नियमाचा फटका बसला आहे. त्यामुळे टीमच्या कामगिरीबरोबच त्यांना बदलत्या वातावरणावरही लक्ष ठेवावं लागणार आहे.

close