वसईकरांचं अनोख होडी आंदोलन

June 19, 2012 3:24 PM0 commentsViews: 6

19 जून

वसई- विरार शहर महानगरपालिका हद्दीत काही भागात पाणी साचल्यानं नागरिक त्रास्त सहन करावा लागतोय. नालासोपारा भागातील गावराई पाडा सुमित्रा चाळीसमोर तलाव सदृष्य पाणी साचलंय. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करुनही पालिका अधिकार्‍यांनी लक्ष न दिल्यानं संतप्त महिलांनी अखेर होडी आंदोलन केलं. संतप्त महिलांनी साचलेल्या या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून अनोख आंदोलन केलं. वाहनांच्या वर्दळीमुळे चिखलाचे पाणी जात आहेत, त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

close