सोलापुरात मृत अर्भक सापडले

June 20, 2012 1:39 PM0 commentsViews: 13

20 जून

स्त्री भ्रूण हत्यांचा प्रश्न राज्यभर गाजत असताना सोलापूरमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली. सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलंय. या अर्भकाला कमरेखालचा भाग नसल्यानं ते स्त्री आहे की पुरूष हे कळायला मार्ग नाही. कुत्र्याने या अर्भकाचा चावा घेतला की जाणीवपूर्वक कमरेखालचा भाग कापण्यत आला याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. रेल्वे स्टेशनच्या तिकीटगृहाजवळ पडलेल्या या अर्भकाला सोलापुरातून कृषी खात्याच्या बैठकीसाठी गेलेल्या सुदर्शना भंडारी यांनी पाहिले. त्यानंतर भंडारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पोलिसांना कळवलं. कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञात व्यक्तिंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरात तिसरी घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

close