‘सीबीएसई’ का ‘एसएससी’ शिकवायचं ?

June 19, 2012 4:39 PM0 commentsViews: 3

19 जून

महापालिकेनं सुरू केलेली देशातली सी.बी.एस.ई अभ्यासक्रम राबवणारी पहिली इ लर्निंग शाळा असा गाजावाजा झालेली पुण्यातली राजीव गांधी इ लर्निंग ऍकडमीची शाळा वारंवार वादात सापडतेय. सी.बी.एस.ईनं अनेक त्रुटी दाखवत मान्यता देण्यास असमर्थता दाखवल्यानं एसएससी बोर्डाचा अभ्यासक्रम शिकवायचा का सी.बी.एस.ई बोर्डाचा हा पेच निर्माण झाला आहे.

या शाळेच्या उभारणीकरता पुढाकार घेणारे काँग्रेस नगरसेवक आबा बागुलांनी महापालिका प्रशासनाकडं बोट दाखवलंय तर या शाळेसंबंधात भोंगळ कारभार उघड करणारे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी केलीय. पुण्यातल्या सहकारनगर भागात गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करत पुणे महापालिकेतर्फे इ लर्निंग शाळा सुरू करण्यात आली. गरीब विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक शाळेत इंग्रजी माध्यमात सी.बी.एस.ई बोर्डाचा अभ्यासक्रम शिकायला मिळमार म्हणून या उपक्रमाचं कौतुक झालं.

ऍडमिशन्स मिळवण्याकरता स्पर्धाही लागली पण शाळा ज्या जागेवर उभी आहे ती जागा प्राथमिक शाळेसाठी राखीव आहे. म्हणजे नियमानुसार तिथे मराठी माध्यमाची शाळा हवी पण सगळे नियम धाब्यावर बसवून तिथे माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सुरू करणार असल्याची घोषणा करण्यात आलीय. त्याशिवाय सी.बी.एस.ईची मान्यताही मिळालेली नाही.

close