सरकारची माघार, 2012 च्या स्कॉलरशिपचा निर्णय रद्द

June 20, 2012 2:12 PM0 commentsViews: 14

20 जून

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये आणि क्रिमीलेअरची अट लादणार्‍या राज्य सरकारने अखेर नमत घेतं आपला निर्णय मागे घेतला आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणार्‍या एससी,एनटी, व्हीजेएनटी,एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थांच्या शैक्षणिक शुल्काच्या परताव्याचे जुनेच निकष कायम ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2012 चा जीआर रद्द करुन 2006 च्याच जीआर नुसार जुनी सवलत कायम राहणार आहेत. त्यामुळे क्रिमीलेअरची दोन लाखांची अट रद्द झाली असून आता उत्पन्नाची अट साडे चार लाख रुपये झाली आहे. यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागिल आठवड्यात 13 जून 2012 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार्‍या स्कॉलरशिपबाबत निर्णय जाहीर केला. चालू शैक्षणिक वर्षापासून मागासवर्गीय कुटुंबातील दोन मुलांना राज्य सरकारची स्कॉलरशिप मिळणार नसून ती फक्त एकालाच मिळणार पण मुलगा आणि मुलगी असेल किंवा दोन्ही मुली असतील तर दोघांना ही स्कॉलरशिप मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा दोन लाख रुपये असणार आहे. तसेच सर्व गटांना सारखीच उत्पन्न मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

विशेष म्हणजे या निर्णयाला छगन भुजबळ यांच्यासह आदी मंत्र्यांनी विरोध केला होता. तरी सुध्दा राज्य सरकारने आपला निर्णय कायम ठेवला. या निर्णयाविरुध्द राज्यभरातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पुणे, नागपूर,मुंबई येथे विविध संघटनांनी आंदोलन करुन सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. सोमवारी विद्यार्थी भारती संघटनेनं मंत्रालयाला ताळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मागावर्गीयांवर असा अन्यायकारक निर्णय का ? घेण्यात आला असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला. अनेक दलित संघटनांनी सरकारच्या धोरणाचा निषेध करत आंदोलनचा पवित्रा घेतला. अखेर आपली घोडचूक मान्यकरत राज्य सरकारने निर्णय मागे घेतला आहे. तरी सुध्दा असा अन्यायकारी निर्णय घेण्याचा सामाजिक न्याय खात्याचा काय हेतू होता असा प्रश्न आता विद्यार्थी विचारत आहे.

close