गोल्फ उत्पादनाला मंदीचा फायदा

November 25, 2008 1:35 PM0 commentsViews: 4

25 नोव्हेंबर दिल्लीहिमांशु सिंघलजागतिक मंदीचा फटका युरोप आणि अमेरिकेतल्या गोल्फ खेळावर होतोय. पण सद्या भारतीय गोल्फला मात्र याचा फायदा होतो आहे. जागतिक मंदीच्या काळातही गोल्फमधले मोठ मोठे ब्रॅण्डस भारतात येऊ लागले आहेत. एशिया गोल्फ इंडस्ट्री शोमध्ये त्याची झलक पाहायला मिळाते. देशातला सर्वात मोठ्‌या गोल्फ ट्रेड शोमध्ये जागतिक मंदी असतानाही आशियातले सर्वोत्तम क्रीडा उत्पादक, कॉर्पोरेट्स आणि व्यापारी माल उत्पादक मोठ्या संख्येने इथे हजर होते. हे सगळं अशा काळात जेव्हा आर्थिक मंदीची झळ जगभरात सर्वत्र जाणवत आहे.जिथे युरोपियन आणि अमेरिकन गोल्फसाठी परिस्थिती चांगली दिसत नाही. तिथे भारताच्या भक्कम योजनामुळे भारतीय गोल्फला मात्र याचा नक्कीच फायदा होणार आहे.

close